CoronaVirus in Akola : दिवसभरात १०६ नवे पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू, ३१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 06:41 PM2020-09-04T18:41:09+5:302020-09-04T19:02:41+5:30

दिवसभरात १०६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४३५६ वर गेली आहे.

CoronaVirus in Akola: 106 new positives per day; Three killed, 31 corona free | CoronaVirus in Akola : दिवसभरात १०६ नवे पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू, ३१ कोरोनामुक्त

CoronaVirus in Akola : दिवसभरात १०६ नवे पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू, ३१ कोरोनामुक्त

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील मलकापूूर, तेल्हारा तालुक्यातील सिरसोली व मुर्तीजापूर येथील प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला. यामुळे मृतकांची एकूण संख्या १६३ झाली आहे. दिवसभरात १०६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४३५६ वर गेली आहे. दरम्यान, ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी ५२७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत ४२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एकट्या मुर्तिजापूर येथील २४ जणांसह, निंबा ता. मुर्तिजापूर येथील ११ जण, वाडेगाव येथील १४ जण,मोरवा ता. बाळापूर येथील सात जण, जीएमसी येथील सहा जण, बाळापूर येथील चार जण, कौलखेड, विद्यानगर गौरक्षणरोड, येथील प्रत्येकी तीन जण, खडकी, गीता नगर, जठारपेठ, डाबकी रोड, दहिगाव गावंडे येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित लहान उमरी, लोणी, चोहट्टा बाजार, तुकाराम चौक, गायत्री नगर, गंगा नगर, गंगाधर प्लॉट, रणपिसे नगर, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, मलकापूर, मराठा नगर, कापसी, तापडीया नगर, निंबवाडी, सकनी महान, पातूर नंदापूर, प्रोफेसर कॉलनी, शिवसेना वसाहत, बळवंत कॉलनी, रवि नगर, नांदुरा ता. तेल्हारा, बटवाडी ता. बाळापूर, कासारखेड ता. बाळापूर व खेडगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

दोन महिला, एक पुरुषाचा मृत्यू
शुक्रवारी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये मलकापूर येथील ५५ वर्षीय महिला, सिरसोली ता. तेल्हारा येथील ६५ वर्षीय महिला व मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या तिघांनाही अनुक्रमे २ सप्टेंबर, १९ आॅगस्ट व २९ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.

३१ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २९ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून दोन जणांना अशा एकूण ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


८१९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४,३५६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,३७४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८१९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: CoronaVirus in Akola: 106 new positives per day; Three killed, 31 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.