CoronaVirus in Akola : अनलॉकच्या ३३ दिवसांनी दिले १०७५ रुग्ण; ५५ मृत्यू
By atul.jaiswal | Published: July 7, 2020 03:28 PM2020-07-07T15:28:25+5:302020-07-07T15:30:53+5:30
अनलॉकच्या ४ जून ते ६ जुलै या ३३ दिवसांच्या कालावधीत तब्बल १,०७५ रुग्णांची भर पडली.
- अतुल जयस्वाल
अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी लागू करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊन ३ जूनपासून शिथिल झाल्यानंतर अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा खºया अर्थाने उद्रेक झाला. अनलॉकच्या ४ जून ते ६ जुलै या ३३ दिवसांच्या कालावधीत तब्बल १,०७५ रुग्णांची भर पडली. तर या काळात ५५ जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
अकोल्यात ‘मिशन बिगिन अंतर्गत’ ४ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करत जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली. तसेच संचाराचे नियम सैल करण्यात आले. नियम शिथिल होताच नागरिकांची बाजारपेठ व रस्त्यांवर वर्दळ वाढली. फिजिकल डिस्टन्स, मास्क न वापरणे यासारख्या नियमांचे पालन न झाल्यामुळे या कालावधीत संपर्कातून संसर्ग वाढत गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पहिला रुग्ण ७ एप्रिल रोजी आढळून आलेल्या अकोल्यात लॉकडाऊन काळातही रुग्णसंख्या वाढत होती; मात्र अनलॉकनंतर रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला. ३ जून रोजी अकोल्यात एकूण बाधितांची संख्या ६६७ होती. तर कोरोनाच्या बळींचा आकडा ३४ होता. ४ जूननंतर यामध्ये झपाट्याने वाढ होत गेली. ६ जुलै रोजी अकोल्यात एकूण बाधितांची संख्या १,७४२ वर गेली आहे. तर मृतांचा आकडाही ८९ झाला आहे.
८०८ जण कोरोनामुक्त
अनलॉकमध्ये कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असली तरी या काळात कोरोनामुक्त होणाºयांची संख्याही दिलासा देणारी आहे. अनलॉकपूर्वी ३ जून रोजी कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४७८ होती. अनलॉकच्या ३३ दिवसांमध्ये ८०८ जणांनी कोरोनावर मात केली. सहा जुलै रोजी आणखी २८ जण बरे झाल्याने कोरोनामुक्त होणाºयांचा एकूण आकडा १,२८६ वर गेला आहे.