CoronaVirus in Akola : पाच दिवसांत १३ जणांचा मृत्यू; ४७८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:11 PM2020-09-05T23:11:11+5:302020-09-05T23:15:01+5:30

कोरोनाबळींचा आकडा १६५ वर गेला असून, एकूण रुग्णसंख्या ४५३१ झाली आहे.

Coronavirus in Akola: 13 deaths in five days; 478 Positive | CoronaVirus in Akola : पाच दिवसांत १३ जणांचा मृत्यू; ४७८ पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola : पाच दिवसांत १३ जणांचा मृत्यू; ४७८ पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, १ ते ५ सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तर तब्बल ४७८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबळींचा आकडा १६५ वर गेला असून, एकूण रुग्णसंख्या ४५३१ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ४१८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२७ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये पातूर तालुक्यातील तांदळी येथील ३८ जणांसह, पिंजर येथील १२ जण, बटवाडी बु. येथील पाच जण, कौलखेड येथील चार जण, केशव नगर येथील तीन जण, हातरुण व सेंट्रल जेल येथील प्रत्येकी आठ जण, जीएमसी, न्यु राधाकीसन प्लॉट, जूने शहर येथील प्रत्येकी तीन जण, कौलखेड, सस्ती, पातूर, गोरेगाव खु. येथील प्रत्येकी दोन जण, गोरक्षण रोड, लहान उमरी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर मंगरुळ, बाळापूर, मालेगाव बाजार, रेणूका नगर, जूने खेतान, राजपूतपुरा, टिळक वाडी, पंचगव्हाण, अमानखॉ प्लॉट, रवि नगर, भारती प्लॉट, रामनगर व बेलूरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

कापशी, मुर्तीजापूरातील रुग्णांचा मृत्यू
शनिवारी आणखी दोन कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये पातूर तालुक्यातील कापसी तलाव येथील ७३ वर्षीय महिला व मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या दोघांनाही २ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

शनिवारी १४७ रुग्णांची भर
शनिवारी दिवसभरात १४७ रुग्ण आढळून आले. व्हीआरडीएल प्रयोगशाळेच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे १२७, नागपूर येथील खाजगी प्रयोगशाळेकडून प्राप्त १६ अहवाल व रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांच्या चार अहवालांचा समावेश आहे.

४६ जण कोरोनामुक्त

शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २०, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १३, मुर्तिजापूर उप जिल्हा रुग्णालयातून सात, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, हॉटेल रणजित येथून एकअशा एकूण ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

९३० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,४२० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९३० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.








 

Web Title: Coronavirus in Akola: 13 deaths in five days; 478 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.