CoronaVirus in Akola : दिवसभरात १३ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ९५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 06:11 PM2020-05-07T18:11:20+5:302020-05-07T18:13:29+5:30
आजचे १३ रुग्ण मिळून जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९५ वर पोहचला आहे.
अकोला : अकोल्यात कोरोना विषाणूने आता चांगलेच बस्तान मांडले असून, कोविड-१९ आजाराची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवार, ७ मे रोजी सकाळी ६ तर सायंकाळी ७ अशा एकून १३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आजचे १३ रुग्ण मिळून जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९५ वर पोहचला असून, सद्यस्थितीत ७० पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.
गुरुवारी एकून ३२ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित १९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आलेले रुग्ण राधाकिसन प्लॉट, उगवा, अकोट फैल, बैदपुरा, माळीपूरा, खंगनपुरा या भागातील आहेत. तर सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सात पैकी चार जण बैदपुरा भागातील, तर उर्वरित तीन जण अनुक्रमे जुने शहर, न्यू भीमनगर व भीमनगर भागातील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.