CoronaVirus in Akola : आणखी १५ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या ११७८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:20 PM2020-06-21T12:20:00+5:302020-06-21T12:20:09+5:30
रविवार, २२ जून रोजी आणखी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ११७८ झाली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, २२ जून रोजी आणखी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ११७८ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ७५२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३६२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी एकूण १३५ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर उर्वरित १२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच महिला व दहा पुरुष आहेत. यामध्ये शंकर नगर व गुलजारपूरा येथील प्रत्येकी तीन, अकोट फाईल येथील दोन, तर गीतानगर, सिंधी कॅम्प अकोट, साबरीपुरा इंदिरानगर, वाशिम बायपास, वृंदावन नगर, नाना उजवणे प्रतिष्ठान जवळ, लाडीस फाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील १३ अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ६४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येचा समावेश आहे.
प्राप्त अहवाल- १३५
पॉझिटीव्ह- १५
निगेटीव्ह-१२०
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ११७८
मयत-६४(६३+१), डिस्चार्ज-७५२
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३६२