CoronaVirus in Akola : १५२ निगेटिव्ह; पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 01:30 PM2020-08-20T13:30:03+5:302020-08-20T13:30:08+5:30
१५७ अहवालांपैकी केवळ पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, उर्वरित १५२ अहवाल निगेटिव्ह आहेत.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसली, तरी संसर्गाचा वेग किंचित कमी होत आहे. गुरुवार, २० आॅगस्ट रोजी प्राप्त एकूण १५७ अहवालांपैकी केवळ पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, उर्वरित १५२ अहवाल निगेटिव्ह आहेत. एकूण रुग्णसंख्या ३३४६ वर पोहचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून गुरुवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १५७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी केवळ पाच जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन महिला व तीन पुरुष आहेत.यामध्ये सिव्हील लाईन येथील दोन जणांसह बाळापूर नाका, जीएमसी क्वॉर्टर व सस्ती ता. पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३३४६ झाली आहे.
३८८ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३४६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २८१७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३८८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.