CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; ३३ रुग्ण वाढले; ४१ जण बरे झाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 07:05 PM2020-08-07T19:05:44+5:302020-08-07T19:58:01+5:30
शुक्रवारी ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
अकोला : कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवार, ७ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १८ तर रॅपिड अॅन्टिजन चाचण्यांमध्ये १५ असे एकूण ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या बळींचा आकडा ११४ वर गेला असून, एकूण रुग्णसंख्या २,९२३ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १५३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३५ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये चार जण बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथील असून, दोन जण बार्शीटाकळी, दोन जण अकोट, दोन जण तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील आहेत. याशिवाय सिव्हिल लाइन, जठारपेठ, जीएमसी वसतिगृह, रामनगर, माधव नगर, दत्त नगर, कैलास टेकडी अकोला आणि मूर्तिजापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढतच असून, गुरुवारी रात्री ६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ येथील रहिवासी असून, त्यांना २८ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.
४१ जणांना डिस्चार्ज
दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १०, कोविड केअर सेंटर येथून १२, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून चार, हॉटेल रणजित येथून तीन असे एकूण ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४६४ जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २,९२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २,३४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४६४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.