CoronaVirus in Akola : दिवसभरात कोरोनाचे १९ रुग्ण वाढले; ३१ जण बरे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 06:50 PM2020-06-17T18:50:07+5:302020-06-17T19:03:01+5:30

बुधवार, १७ जून रोजी दिवसभरात १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधीतांची संख्या १०९२ वर पोहचली आहे.

CoronaVirus in Akola: 19 corona patients increased during the day; 31 people were cured | CoronaVirus in Akola : दिवसभरात कोरोनाचे १९ रुग्ण वाढले; ३१ जण बरे झाले

CoronaVirus in Akola : दिवसभरात कोरोनाचे १९ रुग्ण वाढले; ३१ जण बरे झाले

Next
ठळक मुद्देबुधवारी एकूण ९१ संदिग्ध रुग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७२ अहवाल निगेटिव्ह आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. बुधवार, १७ जून रोजी दिवसभरात १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधीतांची संख्या १०९२ वर पोहचली आहे. दरम्यान, बुधवारी आणखी ३१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३२९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारपर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०७३ होता. यामध्ये बुधवारी आणखी १९ जणांची भर पडत हा आकडा १०९२ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी एकूण ९१ संदिग्ध रुग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७२ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये नऊ महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये दोघे अशोकनगर, दोघे अकोट फैल येथील, तर उर्वरीत दगडीपुल, आदर्श कॉलनी, जुल्फिकार नगर, बार्शीटाकळी व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालांपैकी दहा जण पॉझिटिव्ह असून, यामध्ये पाच जण समतानगर तारफैल येथील, तीन जण खदान येथील तर शिवनी येथील व कारंजा जि. वाशिम येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत ५६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १ कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे.


३१ जणांना डिस्चार्ज
बुधवाारी दुपारी ३१ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला . त्यात १७ जणांना घरी सोडण्यात आले तर १४ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात २२ पुरुष आणि नऊ महिला आहेत. त्यात जीएमसी क्वार्टर येथील चार जण, गुलजार पुरा येथील तीन, तारफैल येथील दोन, मोठी उमरी येथील दोन, जुने शहर येथील दोन, सिंदखेड ता. बार्शीटाकळी येथील दोन, बेलोदे लेआऊट येथील दोन तर  देवी पोलीस लाईन, बाळापूर, गोरक्षण रोड, काळा मारुती, रामदास पेठ, मोहता मिल,  बंजारा नगर, लक्ष्मी नगर, गायत्री नगर, अकोट फैल, खदान, वाशीम बायपास, सिव्हील लाईन, शिवसेना वसाहत  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत एकूण ७०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता ३२९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केल आहे.

प्राप्त अहवाल-९१
पॉझिटीव्ह-१९
निगेटीव्ह-७२


आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०९२
मयत-५६(५५+१),डिस्चार्ज-७०७
दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२९

Web Title: CoronaVirus in Akola: 19 corona patients increased during the day; 31 people were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.