CoronaVirus in Akola : आणखी २० पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या १८७९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:37 AM2020-07-12T11:37:32+5:302020-07-12T11:37:41+5:30
रविवार, १२ जुलै रोजी जिल्हाभरात आणखी २० जण पॉझिटिव्ह आढळून आले.
अकोला : कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला जिल्ह्यात दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवार, १२ जुलै रोजी जिल्हाभरात आणखी २० जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १८७९ वर गेल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी १३८जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ११८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील १३ जण अकोट येथील असून, दोन जण महान, दोन जण बाळापूर, तर उर्वरित सिंधी कॅम्प, मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.
३२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १८७९ (१८५८+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९२ जण (एक आत्महत्या व ९१ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४६४ आहे. तर सद्यस्थितीत ३२३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त अहवाल-१३८
पॉझिटीव्ह-२०
निगेटीव्ह- ११८
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८५८+२१= १८७९
मयत-९२(९१+१)
डिस्चार्ज- १४६४
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३२३