CoronaVirus in Akola : २५ जण कोरोनामुक्त; आणखी १२ रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 06:06 PM2020-07-21T18:06:52+5:302020-07-21T18:09:14+5:30
दिवसभरात २५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा हैदोस सुरूच असून, दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, २१ जुलै रोजी दिवसभरात कोरोनाचे आणखी १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण बाधितांची संख्या २,१८४ वर गेली आहे. दरम्यान, दिवसभरात २५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सद्या ३०१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १८५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७३ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच महिला व सात पुरुष आहेत. यामध्ये बारगणपुरा अकोट येथील तीन, बोरगाव मंजू येथील तीन, अकोला शहरातील रामनगर येथील दोन, तर अकोली जहाँगीर ता. अकोट, जीएमसी, खैर मोहम्मद प्लॉट व जिल्हा कारागृह येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
२५ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून नऊ जणांना,कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन जणांना , ओझोन हॉस्पिटल येथून एका जणास तर हॉटेल रेजेन्सी येथून पाच अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून देण्यात आली.
३०१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू
आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१८४ असून, यापैकी १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३०१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.