CoronaVirus in Akola : आणखी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३७२५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:52 AM2020-08-28T11:52:46+5:302020-08-28T11:52:54+5:30
शुक्रवार, २८ आॅगस्ट रोजी आणखी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हू नसून, या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, २८ आॅगस्ट रोजी आणखी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,७२५ वर पोहचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, १३५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३२ जणांमध्ये आठ महिला व २४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये डाबकी रोड अकोला येथील चार, तेल्हारा येथील तीन, जुने शहर येथील दोन, किर्ती नगर येथील दोन, अकोट येथील दोन, बाजोरीया हाऊस येथील दोन, मुर्तीजापूर तालुक्यातील सांजापूर येथील एक, तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील एक, पातूर तालुक्यातील गावंड येथील एक, सिंधी कॅम्प येथील एक, मलकापूर येथील एक, मराठा नगर येथील एक, पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील एक, महादेव नगर येथील एक, म्हैसांग येथील एक, रामदास पेठ येथील एक, हिंगणा फाटा येथील एक , हरिहर पेठ येथील एक , पंचशील नगर येथील एक , आगर येथील एक , हिवरखेड येथील एक व अकोट फैल येथील एक अशा ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
४८८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,७२५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३०९० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४८८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.