CoronaVirus in Akola : आणखी ३७ पॉझिटिव्ह; एकूण बाधित १७७९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 04:22 PM2020-07-07T16:22:44+5:302020-07-07T16:22:51+5:30
मंगळवार, ७ जुलै रोजी जिल्ह्यात आणखी ३७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. मंगळवार, ७ जुलै रोजी जिल्ह्यात आणखी ३७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या १७७९ वर गेली आहे.
विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी एकूण ४९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर पातूर येथील रॅपिड टेस्ट मोहिमेदरम्यान पाच व सहा जुलै रोजी २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. व्हीआरडीएल लॅबकडून प्राप्त अहवालांमध्ये १६ पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ३३ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये ७ महिला तर ९ पुरुष रुग्ण आहेत. यामध्ये कच्ची खोली येथील ५, अकोट येथील तीन, सिंधी कॅम्प व नानकनगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित जीएमसी, पक्की खोली, आदर्श कॉलनी, अकोट फाईल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
दरम्यान, ५व ६ रोजी पातूर येथे करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये(११ व १०) असे २१ पॉझिटीव्ह रुग्ण आले आहेत. त्यांचा समावेश आज करण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण बाधितांचा आकडा १७७९ वर गेला आहे
आणखी दोघांना डिस्चार्ज
दरम्यान,सोमवारी रात्री दोन रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत ४०२ जणांवर उपचार सुरु आहेत.