CoronaVirus in Akola : आणखी ४ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २०६१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:30 AM2020-07-18T11:30:30+5:302020-07-18T11:31:50+5:30
‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये चार जण पॉझिटिव्ह आढळून आले.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शनिवार, १८ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून प्राप्त ‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये चार जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे एकूण बाधितांची संख्या २,०६१ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारीसकाळी १५८ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५४ निगेटिव्ह, तर चार पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह आढळून आलेले चौघेही पुरुष असून, यामध्ये बोरगाव मंजू येथील तीन, तर अकोट तालुक्यातील अकोली जहांगिर येथील एकाचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत १६६७ जण पूर्णपणे बरे झाले असून, १०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २९५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.