CoronaVirus In Akola : ४१ जणांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटीव्ह’; २४ नव्याने दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:39 PM2020-04-01T17:39:16+5:302020-04-01T17:42:46+5:30
२४ संशयित रुग्ण नव्याने दाखल झाले असून, बुधवारी सकाळीच त्यांचे ‘स्वॅब’तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत.
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत कोरोनाचे ६५ संशयित रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ४१ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटीव्ह’ आले आहेत. यामध्ये प्रलंबित ११ रुग्णांपैकी ८ रुग्णांचा समावेश आहे. तर २४ संशयित रुग्ण नव्याने दाखल झाले असून, बुधवारी सकाळीच त्यांचे ‘स्वॅब’तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा बाधित रुग्ण नसला, तरी संशयित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी रात्री उशीरा वाडेगाव येथून १८ संशयित रुग्णांना जीएमसीत दाखल करण्यात आले, तर बुधवारी दिवसभरात इतर ६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे ‘स्वॅब’ घेण्यात आले असून, ते नागपूर येथे पाठविण्यात आले. यातील आठ रुग्णांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरीत रुग्णांना वार्ड क्रमांक २१, २४ मध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. बुधवारी एकाही रुग्णाला सुट्टी देण्यात आली नसून, तिन्ही वार्डात एकूण ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
११७ रुग्णांची वैद्यकीय तपासणी कोरोना समुपदेशन कक्षात मंगळवारी ११७ रुग्णांची तपासणी करु न त्यांना समुपदेशन करण्यात आले. कक्ष सुरु झाल्यापासून आतापर्यंत दोन हजार ८५९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
‘त्या’ निगेटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूसर्वोपचार रुग्णालयात स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागात एक महिला २८ मार्च रोजी दाखल झाल्याची माहिती आहे. उपचारादरम्यान त्या महिलेची प्रकृती ठिक नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची कोरोना तपासणीसाठी ‘स्वॅब’पाठविले होते. दरम्यान ३० मार्च रोजी त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. बुधवारी त्या रुग्णाचा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आला.
विदर्भात एकच ‘व्हीआरडीएल’लॅबअकोल्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी नागपूर येथील ‘व्हीआरडीएल’ लॅब केली जाते. ही विदर्भातील एकमेव लॅब आहे. तर दुसरीकडे संशयित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या लॅबवर कामाचा ताण वाढला असून, अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.