CoronaVirus in Akola : आणखी ४८ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या १२४० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:49 PM2020-06-22T12:49:33+5:302020-06-22T12:51:28+5:30
आणखी ४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या १२४० झाली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, सोमवार, २२ जून रोजी आणखी ४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या १२४० झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ७६२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ४१२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी एकूण १८० संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर उर्वरित १३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये २२ महिला व २६ पुरुष आहेत. यामध्ये बाळापूर येथील आठ, अकोट फाईल, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गुलजारपुरा येथील चार, गंगानगर व पिंपळखुटा येथील प्रत्येकी तीन, शंकर नगर, शिवसेना वसाहत व पातुर येथील प्रत्येकी दोन, कमला नेहरु नगर, सोळाशे प्लॉट, खदान, कळंबेश्वर, बार्शीटाकळी, शिवनी, अकोट, दुर्गा नगर, तारफैल, महाकाली नगर, गांधी नगर, सोनटक्के प्लॉट, गीता नगर, भगतवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आतापर्यंत ६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
प्राप्त अहवाल- १८०
पॉझिटीव्ह- ४८
निगेटीव्ह- १३२
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४०
मयत-६६ (६५+१), डिस्चार्ज- ७६२
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४१२