CoronaVirus in Akola : दिवसभरात ५१ पॉझिटिव्ह; तीन कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 06:25 PM2020-06-22T18:25:26+5:302020-06-22T18:32:28+5:30
सोमवार, २२ जून रोजी दिवसभरात ५१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या १२४३ झाली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असून, सोमवार, २२ जून रोजी दिवसभरात ५१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या १२४३ झाली आहे. दरम्यान, आज आणखी तिघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ४१२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात एकूण १९४ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५१ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर उर्वरित १४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये ४८ जणांमध्ये २२ महिला व २६ पुरुष आहेत. यामध्ये बाळापूर येथील आठ, अकोट फाईल, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गुलजारपुरा येथील चार, गंगानगर व पिंपळखुटा येथील प्रत्येकी तीन, शंकर नगर, शिवसेना वसाहत व पातुर येथील प्रत्येकी दोन, कमला नेहरु नगर, सोळाशे प्लॉट, खदान, कळंबेश्वर, बार्शीटाकळी, शिवनी, अकोट, दुर्गा नगर, तारफैल, महाकाली नगर, गांधी नगर, सोनटक्के प्लॉट, गीता नगर, भगतवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत. आज सायंकाळी प्राप्त अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. ते सिदाजी वेटाळ पातूर, राजपूतपुरा, तोष्णीवाल ले आऊट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, आतापर्यंत ६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
तिन महिलांना डिस्चार्ज
दरम्यान, सोमवारी दुपारनंतर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात तिनही महिला असून, तिघींना घरी सोडण्यात आले आहे. त्या भांडपुरा, हमजा प्लॉट आणि वाशिम बायपास येथील रहिवासी आहेत.
४१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १२४३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ६६ जण (एक आत्महत्या व ६५ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ७६५आहे. तर सद्यस्थितीत ४१२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त अहवाल- १९४
पॉझिटीव्ह- ५१
निगेटीव्ह- १४३
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४३
मयत-६६ (६५+१), डिस्चार्ज- ७६५
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४१२