CoronaVirus in Akola : दिवसभरात ५३ कोरोनामुक्त; ४ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 18:28 IST2020-10-05T18:28:27+5:302020-10-05T18:28:36+5:30
CoronaVirus in Akola : ५३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

CoronaVirus in Akola : दिवसभरात ५३ कोरोनामुक्त; ४ नव्या रुग्णांची भर
अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाला आॅक्टोबर महिन्यात ब्रेक लागला आहे. सोमवार, ५ आॅक्टाबर रोजी दिवसभरात ५३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये केवळ चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७,६४५ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ६९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी केवळ चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये चारही पुरुष असून, ते रामदास पेठ, जयहिंद चौक, देवराव बाबा चाळ व जीएमसी येथील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
येथे भरती रुग्णांना डिस्चार्ज
सोमवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १५, कोविड केअर सेंटर अकोला येथून सहा, युनिक हॉस्पिटल येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, अकोला अक्सिडेंट क्लिनिक येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून एक, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले २२ अशा एकूण ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
८३२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,६४५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६५६९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८३२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.