CoronaVirus in Akola : दिवसभरात ५७ नवे पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४२१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 06:24 PM2020-06-27T18:24:29+5:302020-06-27T18:26:31+5:30
शनिवार, २७ जून रोजी दिवसभरात ५७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, २७ जून रोजी दिवसभरात ५७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १४२१ झाली आहे. आतापर्यंत एकूण १०४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३०० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात २७० संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त ४२ पॉझिटिव्ह अहवालात १९ महिला व २३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये हरिहरपेठ येथील सहा, अकोट फैल येथील पाच, समर्थनगर पातूर येथील चार, न्यू राधाकिसन प्लॉट, सिंधी कॅम्प, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड येथील दोन, तर आदर्श कॉलनी, सोनटक्के प्लॉट, बाळापूर रोड, कौलखेड, गंगानगर, गीतानगर, शिवर, शिवसेना वसाहत, गुलजारपुरा, कमलानगर, पोळा चौक, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोट व मंगळूरपीर जि. वाशीम येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व नऊ पुरुष आहे. त्यातील सात जण हरिहर पेठ येथील, तिघे रजपूत पुरा येथील तर उर्वरित डाबकी रोड, हरिहर मंदिर, खडकी, बाळापूर व मंगळूरपीर जि. वाशीम येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.
३०० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १४२१ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७४ जण (एक आत्महत्या व ७३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०४७ आहे. तर सद्यस्थितीत ३०० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्राप्त अहवाल-२७०
पॉझिटीव्ह अहवाल-५७
निगेटीव्ह-२१३
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १४२१
मयत-७४ (७३+१)
डिस्चार्ज-१०४७
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३००