Coronavirus in Akola : आणखी ६५ पॉझिटिव्ह रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:57 AM2020-08-07T10:57:53+5:302020-08-07T10:58:09+5:30
गुरुवारी प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये व्हीआरडीएल लॅबमधील ५५, तर रॅपिड अॅन्टिजन टेस्टमधील १० अहवालांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढताच असून, गुरुवारी त्यात आणखी ६५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या जास्त असल्याने ही ग्रामीण भागासाठी धोक्याची घंटा आहे. गुरुवारी प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये व्हीआरडीएल लॅबमधील ५५, तर रॅपिड अॅन्टिजन टेस्टमधील १० अहवालांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. सलग चार महिन्यांपासून रुग्णसंख्येतील वाढ थांबण्याचे चिन्ह दिसून येत नाही. जून, जुलैप्रमाणेच आॅगस्ट महिन्यातही हा वेग कायम असून, गुरुवारी आणखी ६५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील ५५ अहवाल व्हीआरडीएल लॅबमधील आहेत. यामध्ये ३२ महिला व २३ पुरुष आहेत. त्यात अकोट येथील १२, आगर ता. अकोला येथील सात, शास्त्रीनगर सहा, सिंधी कॅम्प चार, पुनोती ता. बार्शीटाकळी येथील तीन तर रामनगर, कौलखेड, शिवणी, वाशिम बायपास, जुना कॉटन मार्केट, गणेश नगर, गोरक्षण रोड, डाळंबी ता. अकोला व सांगवा मेळ ता. मूर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी वाडेगाव येथील नऊ, रिधोरा येथील तीन तर पुनोती ता. बार्शीटाकळी येथील दोन जण याप्रमाणे रहिवासी आहेत. आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या २,८९० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर २,३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातून दोन, तर खासगी रुग्णालयातून सहा, अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.