Coronavirus in Akola : दिवसभरात ७८ पॉझिटिव्ह; २५ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 06:32 PM2020-08-30T18:32:42+5:302020-08-30T18:32:49+5:30

शायकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरटपीसीआर चाचण्यांमध्ये ६५, तर नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालात १३, असे एकूण ७८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

Coronavirus in Akola: 78 positive throughout the day; 25 people defeated Corona | Coronavirus in Akola : दिवसभरात ७८ पॉझिटिव्ह; २५ जणांची कोरोनावर मात

Coronavirus in Akola : दिवसभरात ७८ पॉझिटिव्ह; २५ जणांची कोरोनावर मात

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, ३० आॅगस्ट रोजी शायकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरटपीसीआर चाचण्यांमध्ये ६५, तर नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालात १३, असे एकूण ७८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,९४२ वर पोहचली आहे. दरम्यान, आतापर्यंत १५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी २५३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत १८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये २६ महिला व ३९ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मोºहळ ता. बाशीर्टाकळी येथील १६ जण, सस्ती ता.पातूर येथील नऊ जण, मूर्तिजापूर येथील आठ जण, गोरक्षण रोड येथील पाच जण, डाबकी रोड येथील चार जण, पंचशील नगर व किर्ती नगर येथील प्रत्येकी तीन जण, जीएमसी व कौलखेड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित वाडेगाव, राधाकिसन प्लॉट, आलेगाव ता. पातूर, कृषी नगर, निंबधे प्लॉट, पळसो बधे, सोनारी ता. मूर्तिजापूर, पिंजर,जुने खेतान नगर, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, सौंदळा ता. तेल्हारा व बटवाडी ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.


खासगी प्रयोगशाळेचे १३ अहवाल पॉझिटिव्ह
डॉ. हेडगेवार हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत घेण्यात आलेले नमुने तपासणीसाठी नागपूर येथील खासगी प्र्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


२५ जणांना डिस्चार्ज
रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ६, कोविड केअर सेंटर येथून १४, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


६२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,९४२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३१६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Coronavirus in Akola: 78 positive throughout the day; 25 people defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.