CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; १३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा २६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:39 IST2020-05-26T12:14:11+5:302020-05-26T12:39:23+5:30
१३ जणांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिव्हि आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४२८ वर गेली आहे.

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; १३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा २६
अकोला : कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवारी आणखी १३ जणांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिव्हि आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४२८ वर गेली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री बाळापूर येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने मृतकांचा हीआकडा २६ झाला असून, सद्यस्थितीत १५१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
एप्रिल महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्यानतर मे महिन्यात कोरोनाच्या संक्रमनाने वेग घेतला असून, सोमवार, २५ मे रोजी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४१५ वर पोहचली होती. यामध्ये मंगळवारी आणखी नवीन १३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. मंगळवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून एकूण २८३ संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७० अहवाल निगेटिव्ह असून, उर्वरित १३ अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये १० पुरुष व तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये तीन जण मलकापूर, तीन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित प्रत्येकी नवाबपुरा, अकोट फैल, बाळापूर रोड, शिवाजी पार्क, राऊतवाडी, सतरंजपूरा,बाळापूर, पिंजर ता. बार्शीटाकळी, येथील रहिवासी असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.
दरम्यान , सोमवारी रात्री एका ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. तो दि.२२ मे रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल कालच पॉझिटिव्ह आला. त्याचा उपचार सुरु असताना काल मृत्यू झाल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने कळविले आहे. आतापर्यंत मृतकांची संख्या २६ झाली असून, यामध्ये एका कोरोनाबाधिताची आत्महत्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण १५१ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल-२८३
पॉझिटीव्ह-१३
निगेटीव्ह-२७०
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ४२८
मयत-२६(२५+१) ,डिस्चार्ज- २५१
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १५१