CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; १९ पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १०४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:35 PM2020-07-29T12:35:56+5:302020-07-29T12:36:06+5:30

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्य १९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

CoronaVirus in Akola: Another victim; 19 positive; Death toll rises to 104 | CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; १९ पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १०४ वर

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; १९ पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १०४ वर

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, २९ जुलै रोजी तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्य १९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०४ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २५१५ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १२७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित १०८ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये नऊ महिला व १० पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल असलेल्यांमध्ये अकोट येथील १५ जणांसह अकोला शहरातील दगडीपूल, बाभूळळगाव, पांढरी व तेल्हारा तालुक्यातील राणेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

हिवरखेड येथील महिलेचा मृत्यू
दरम्यान, बुधवारी आणखी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. ही ६० वर्षीय महिला तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील असून, त्यांना १५ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


३८० जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५१५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०३१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३८० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

Web Title: CoronaVirus in Akola: Another victim; 19 positive; Death toll rises to 104

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.