Coronavirus in Akola: आणखी एक बळी; २८ नवे पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ९१२
By atul.jaiswal | Published: June 11, 2020 12:12 PM2020-06-11T12:12:17+5:302020-06-11T12:13:59+5:30
Coronavirus in Akola: आणखी एक बळी; रुग्णसंख्या ९१२ वर गेली आहे.
Next
href='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला : अकोल्यात बस्तान मांडलेल्या कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व संक्रमित होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. गुरुवार, ११ मे रोजी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने या आजाराला बळी पडणाºयांची संख्या ४३ झाली आहे. तर आणखी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९१२ झाला आहे. सद्यस्थितीत २९२ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी सकाळी ६६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १० महिला व १८ पुरुष आहेत.त्यातील पाच जण आदर्श कॉलनी, तीन जण खदान, दोन जण तार फ़ैल, दोन जण इंदिरानगर वाडेगाव ,दोन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित दसेरानगर, गुलजारपूरा, दगडीपूल, मोहतामिल, अकोट फ़ैल, जीएमसी क्वांर्टर, गंगा नगर, बंजारा नगर, उमरी, शेलार फ़ैल गुरुद्वारा पेठ जवळ, नेहरू नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी, टॉवर रोड, जुने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.दरम्यान काल(दि.१०) रात्री उपचार घेताना ७६ वर्षीय इसमाचे निधन झाले.हा इसम हरिहरपेठ येथील रहिवासी असून तो दि.३जून रोजी दाखल झाला होता. प्राप्त अहवाल-६६पॉझिटीव्ह-२८निगेटीव्ह-३८ आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-९१२मयत-४३(४२+१),डिस्चार्ज-५७७दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२९२