CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह, ४० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 06:06 PM2020-10-06T18:06:10+5:302020-10-06T18:06:16+5:30

CoronaVirus in Akola : दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४६ वर गेला आहे.

CoronaVirus in Akola: Both die during the day; 29 new positive, 40 corona free | CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह, ४० कोरोनामुक्त

CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह, ४० कोरोनामुक्त

googlenewsNext

अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. मंगळवार, ६ आॅक्टाबर रोजी अकोला शहर एक व तेल्हारा तालुक्यातील एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४६ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २९ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७६७८ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २५९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर येथील पाच जणांसह अकोट व प्रसाद नगर येथील प्रत्येकी दोन, राम नगर डाबकी रोड, बाळापूर नाका, अर्शद नगर, न्यू तापडिया नगर, शांती नगर, वानखडे नगर, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, देशमुख फाईल, जऊळका ता.अकोट, मलकापूर व दहिगाव ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी बाळापूर, केशव नगर, अकोट फाईल, सिंधी कॅम्प, कौलखेड, अकोट, डाबकी रोड व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दोन पुरुषांचा मृत्यू
मंगळवारी आणखी दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी एक रुग्ण तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथील ५० वर्षीय पुरुष असून, त्यांना ३ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. तर दुसरा रुग्ण हा बिर्ला रेल्वे कॉलनी, जठारपेठ येथील ९८ वर्षीय पुरुष असून, त्यांना २९ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

४० जणांना डिस्चार्ज
मंगळवारी आणखी ४० जणांनी कोरोनावर मात केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २६, कोविड केअर सेंटर अकोला येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून तीना, अवधाते हॉस्पिटल येथून तीन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून तीन अशा एकूण ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

८२३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,६७८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६६०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८२३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: CoronaVirus in Akola: Both die during the day; 29 new positive, 40 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.