CoronaVirus in Akola : ‘दोघे निगेटिव्ह’; २४ अहवालांची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:01 AM2020-04-03T11:01:25+5:302020-04-03T11:01:32+5:30
अकोला : कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या प्रलंबित वैद्यकीय चाचणीचे दोन अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून, ते दोन्ही ‘निगेटिव्ह’ आले. २४ ...
अकोला : कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या प्रलंबित वैद्यकीय चाचणीचे दोन अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून, ते दोन्ही ‘निगेटिव्ह’ आले. २४ अहवालांची अद्यापही प्रतीक्षा आहे. यासोबतच दोन नवे रुग्ण दाखल झाल्याने एकूण संधिग्ध रुग्णांची संख्या ६७ वर पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत ४३ जण ‘निगेटिव्ह’ आले आहेत.
गत दोन दिवसांच्या तुलनेत कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या संख्येत कमी दिसून आली. गुरुवारी केवळ दोनच नवे रुग्ण ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल झाले. दुसरीकडे वैद्यकीय चाचणी अहवाल येण्यास विलंब होत असल्याने ‘आयसोलेशन’ कक्षात संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. बुधवारपर्यंत कक्षात ३३ रुग्ण दाखल होते. त्यातील ९ रुग्णांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना गुरुवारी सुटी देण्यात आली असून, २४ संशयित रुग्णांवर ‘आयसोलेशन’ कक्षात उपचार सुरू आहेत.
‘त्या’ १८ संधिग्ध रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा!
वाडेगाव येथून मंगळवारी रात्री उशिरा १८ जणांना वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांचे ‘स्वॅब’ नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत; परंतु अद्यापही त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले नाहीत.