CoronaVirus in Akola : दिलासादायक...१२२ पैकी ६२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 06:37 PM2020-04-06T18:37:26+5:302020-04-06T18:38:55+5:30
सोमवारी एकही संदिग्ध रुग्णाची नोंद झाली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सोमवारी दिली.
ठळक मुद्दे आज एकही नवा संदिग्ध नाही ६०जणांचे अहवाल प्रलंबित
अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संदिग्ध म्हणून तपासणी झालेल्यांपैकी ६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, आणखी ६० जणांच्या अहवालांची प्रतिक्षा आहे. हे सर्वसध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत दरम्यान, सोमवारी एकही संदिग्ध रुग्णाची नोंद झाली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सोमवारी दिली.
जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून २५७ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ५५ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. तर १२४ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ६० जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.