CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ३३ नवे पॉझिटिव्ह, ५० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:53 PM2020-07-24T17:53:47+5:302020-07-24T17:53:55+5:30

शुक्रवार, २४ जुलै रोजी दिवसभरात  मुर्तीजापूर तालुक्यातील एका जणाचा मृत्यू झाला.

CoronaVirus in Akola: Death of another; 33 new positives, 50 corona free | CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ३३ नवे पॉझिटिव्ह, ५० कोरोनामुक्त

CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ३३ नवे पॉझिटिव्ह, ५० कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देशुक्रवार, २४ जुलै रोजी दिवसभरात  मुर्तीजापूर तालुक्यातील एका जणाचा मृत्यू झाला.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा हैदोस सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, २४ जुलै रोजी दिवसभरात  मुर्तीजापूर तालुक्यातील एका जणाचा मृत्यू झाला. तर ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा ९९ झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३३४ झाली आहे. दरम्यान, ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ११० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७७ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मध्यवर्ती कारागृहातील १५ जणांसह, रामदासपेठ येथील तीन, महान येथील तीन जण, मोठी उमरी, लोटनपूर व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण, अडगाव बु., कुटासा, जूने शहर, खदान, वाडेगाव व जेल क्वॉटर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

मुर्तीजापूर तालुक्यातील एकाचा मृत्यू
शुक्रवारी मुर्तीजापूर तालुक्यातील बारामी खुर्द येथील ६२ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २० जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

५० जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून २९ जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून नऊ जणांना अशा एकूण ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्या ३८७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

परजिल्ह्यातील ५६ पॉझिटिव्ह, आठ मृत्यू वगळले
अकोला जिल्हा बाहेरील ५६ पॉझिटिव्ह व सात मयत व एक आत्महत्या असे एकूण आठ मयत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी दिलेल्या पत्रानुसार अहवालातून वगळण्यात आले आहे.


एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१११+२२३=२३३४
मयत-९९
डिस्चार्ज- १८४८
दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८७

Web Title: CoronaVirus in Akola: Death of another; 33 new positives, 50 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.