CoronaVirus in Akola: एकाचा मृत्यू; ३६ पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 11:12 AM2020-10-09T11:12:15+5:302020-10-09T11:12:22+5:30
Coronavirus news, Akola गत सहा महिन्यांपासून दररोज सरासरी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.
अकोला : जिल्ह्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी त्यात दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. गुरुवारी त्यात आणखी ३६ रुग्णांची भर पडली. यातील २४ पॉझिटिव्ह अहवाल हे आरटीपीसीआर चाचणीचे, तर १२ अहवाल रॅपिड अॅन्टिजन चाचणीचे आहेत. तर दुसरीकडे मृत्यूचे सत्र सुरूच असून, आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.
गत सहा महिन्यांपासून दररोज सरासरी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. हे सत्र सुरूच असून, गुरुवारी त्यात आणखी एकाची भर पडली. मृत रुग्ण हा रामदासपेठस्थित संतोषी माता मंदिर परिसरातील ६५ वर्षीय व्यक्ती होता. ६ आॅक्टोबर हा रुग्ण दाखल झाला होता. गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये बार्शीटाकळी येथील तीन जण, गीता नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन उर्वरित राजपूतपुराजवळ, जवळका ता. अकोट, अजनी ता. बार्शीटाकळी, कृषी नगर, आदर्श कॉलनी, मोहम्मद अली रोड, संतोषी माता मंदिरजवळ, खदान, शिवाजी चौक, शिवनी, अकोट, जीएमसी व निंभोरा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये अकोट, फुले चौक, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. यासह रॅपिड अॅन्टिजन टेस्टमध्ये १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
४२ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३१ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून चार जण, अवघाते हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून एक जण, अकोला अॅक्सिडेंट क्लिनिक येथून पाच जण व सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक जणाला, अशा एकूण ४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.