CoronaVirus in Akola : एकाचा मृत्यू; ६२ ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:25 AM2020-08-28T10:25:02+5:302020-08-28T10:25:22+5:30
३२ अहवाल आरटीपीसीआरचे, तर ३१ अहवाल रॅपिड अॅन्टीजन टेस्टचे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्यावाढीचा वेग मंदावला होता; मात्र गत काही दिवसात कोरोनाचा कहर पुन्हा वाढला असून, गुरुवारी आणखी एकाचा बळी गेला आहे. तर ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ३२ अहवाल आरटीपीसीआरचे, तर ३१ अहवाल रॅपिड अॅन्टीजन टेस्टचे आहेत.
कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असताना मृत्यूदरही कायम आहे. गुरुवारी त्यात आणखी एका मृत्यूची भर पडली. हा ५८ वर्षीय रुग्ण खेडकरनगर येथील रहिवासी असून, उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तर आरटीपीसीआरचे ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये सात महिला व २५ पुरुष आहेत. त्यात सहा जण सिरसोली ता. अकोट येथील तर दोन जण अकोट येथील, पाच जण वरुर ता. तेल्हारा येथील, तीन जण तेल्हारा येथील, चार जण सुटाळा येथील रहिवासी असून, दोन जण जीएमसी येथील तर अन्य माउंट कारमेल शाळेजवळ, पंचशील नगर, संताजी नगर, शास्त्री नगर, काटखेड ता. बार्शीटाकळी, सस्ती ता. पातूर, मलकापूर, मूर्तिजापूर, डाबकी रोड, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
२० जणांना डिस्चार्ज!
दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून सात, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून पाच असे एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनाने वैद्यकीय अधिकाऱ्याचा बळी!
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कोरोनाविरुद्ध लढत आहेत. अशातच गुरु वारी आणखी एका वैद्यकीय अधिकाºयाचा कोविडमुळे मृत्यू झाला. मृत्यू पावलेले ५८ वर्षीय वैद्यकीय अधिकारी हे मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात सीएमओ पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वीदेखील अकोल्यातील एका वैद्यकीय अधिकाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.