CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू; नऊ पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ७९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:15 PM2020-06-30T12:15:08+5:302020-06-30T12:17:40+5:30
मंगळवार, ३० जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, ३० जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. तर आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ७९ वर गेला आहे. तर एकूण रुग्ण संख्या १५४५ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून, मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण १९१ कोरोना संदिग्धांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. नऊ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. यापैकी दोघे जण बाळापूर येथील तर दोघे अकोट येथील आहेत. तसेच चिखलगाव, सिंधी कॅम्प, कळंबेश्वर, डाबकीरोड व शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
दोघांचा सोमवारी रात्री मृत्यू
कोरोनामुळे दगावणाºयांची संख्याही वाढत आहे. सोमवारी रात्री दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी एक अकोला शहरातील गंगानगर भागातील ७४ वर्षीय महिला असून, त्यांना १४ जून रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक जण अकोट येथील ५६ वर्षीय पुरुष असून, त्यांना २७ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या दोघांचाही सोमवारी रात्री मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
३७३ रुग्णांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत १०९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत ७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३७३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्राप्त अहवाल-१९१
पॉझिटीव्ह अहवाल-०९
निगेटीव्ह-१८२
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५४५
मयत-७९ (७८+१)
डिस्चार्ज-१०९३
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३७३