CoronaVirus in Akola: अकोल्यात एकाच दिवशी पाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 06:48 PM2020-04-28T18:48:56+5:302020-04-28T19:35:19+5:30

हे पाचही रुग्ण सिंधी कॅम्प परिसरात रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत.

CoronaVirus in Akola: Five positive in a single day in Akola; active patients 12 | CoronaVirus in Akola: अकोल्यात एकाच दिवशी पाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

CoronaVirus in Akola: अकोल्यात एकाच दिवशी पाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

googlenewsNext
ठळक मुद्देआज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ४५ अहवाल प्राप्त झाले. त्यातले ३९ अहवाल निगेटीव्ह तर अन्य सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. एक अहवाल हा फेरतपासणीचा असून उर्वरित पाचही जणांचे प्राथमिक अहवाल आहेत.

अकोला : कोरोनाबाधीतांचा आकडा वाढतच असून, मंगळवारी एकाच दिवशी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे, हे पाचही रुग्ण सिंधी कॅम्प परिसरात रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या निकट संपर्कातील आहेत.


आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ४५ अहवाल प्राप्त झाले. त्यातले ३९ अहवाल निगेटीव्ह तर अन्य सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील एक अहवाल हा फेरतपासणीचा असून उर्वरित पाचही जणांचे प्राथमिक अहवाल आहेत. आता पॉझिटीव्ह अहवालांची संख्या २२ झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ५९९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५८७ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५६५ अहवाल निगेटीव्ह २२ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व १२ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ५९९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४७३, फेरतपासणीचे ८५ तर वैद्यकीय कर्मचा?्यांचे ४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५८७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४६४ तर फेरतपासणीचे ८५ व वैद्यकीय कर्मचा?्यांचे ३८ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५६५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २२ आहेत.


आज प्राप्त झालेल्या ४५ अहवालात ३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील पाच हे प्राथमिक तपासणीचे असून अन्य एक हा फेरतपासणीचा अहवाल आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.


जिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या २२ झाली आहे. त्यातील दोघे मयत झाले. गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास असे आठ जण पूर्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आज नव्याने पाच पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे आजअखेर १२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान फेरतपासणीतही पॉझिटीव्ह अहवाल आलेला रुग्ण हा बैदपूरा भागातील तीन वर्षीय बालक आहे.


पाचही पॉझिटिव्ह सिंधी कॅम्पातील रुग्णाच्या संपकार्तील
रविवारी (दि.२६) पॉझिटीव्ह आढळलेल्या सिंधी कॅम्प भागातील रहिवासी असलेल्या रुग्णाच्या संपकार्तील तब्बल ४७ जण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ४१ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यात पाच जण पॉझिटीव्ह तर अन्य ३६ जण निगेटीव्ह आले आहेत. यातले पाच ही नवे पॉझिटीव्ह रुग्ण हे याच रुग्णाच्या संपकार्तील आहेत. त्यात या रुग्णाची पत्नी, दहा वषार्चा मुलगा, वहिनी व दोघे नोकर (कृषि नगर जवळील न्यू भीमनगर व खदान परिसरातील) असे हे पाच जण आहेत.


प्रतिबंधित क्षेत्रात वाढ
रविवारी (दि.२६) पॉझिटीव्ह आढळलेल्या सिंधी कॅम्प भागातील रहिवासी असलेल्या रुग्णाच्या संपकार्तील तब्बल ४७ जण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी पाच जण आज पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील तिघे हे रुग्णाच्या कुटुंबातीलच सदस्य आहेत. तर अन्य दोघे नोकर असून ते कृषिनगर परिसरातील न्यू भिमनगर व खदान अशा भागात रहातात. त्यामुळे आता प्रतिबंधित क्षेत्रात कृषिनगर, न्यू भिमनगर या भागाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सिव्हील लाईन परिसरातील जेएमडी मार्केटचा काही भागही आता सिल करण्यात आला असल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिले आहेत. तसेच या भागात आता मनपाची १५ पथके तैनात करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे.


३५ जण संस्थागत अलगीकरणात स्थलांतरीत
दरम्यान, आजपर्यंत दाखल प्रवाशी संख्या ६२८ असून २४४ गृह अलगीकरणात तर ९४ हे संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३३८ अलगीकरणात आहेत. आतापर्यंत २४० जणांची गृह अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत संपली आहे. तर विलगीकरणात ५० रुग्ण दाखल आहेत. आज नव्याने आठ संदिग्ध दाखल झाले आहेत. तर आज सायंकाळी ३५ जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील संस्थागत अलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus प्लाझ्मा थेरपी कोरोनावरचा उपचार नाही, आवरा; केंद्राचा राज्यांना इशारा

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

आनंद महिंद्रांवर आली 'ते' ट्विट डिलीट करण्याची वेळ; नम्रतेने माफीही मागितली

छत्तीसगडमध्ये आकाशातून घरांवर 'गोळीबार'; छपराच्या चिंधड्या उडाल्या

कोरोनाची लस चोरण्यासाठी चीनचा खटाटोप; अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला

 

Web Title: CoronaVirus in Akola: Five positive in a single day in Akola; active patients 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.