CoronaVirus in Akola : दिवसभरात चार पॉझिटिव्ह; चौघांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या २६१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:14 PM2020-05-18T19:14:20+5:302020-05-18T19:17:17+5:30

आज राधाकिसन प्लॉट भागातील चार जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

CoronaVirus in Akola: four positives throughout the day; Discharge to four; Total number of patients 261 | CoronaVirus in Akola : दिवसभरात चार पॉझिटिव्ह; चौघांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या २६१

CoronaVirus in Akola : दिवसभरात चार पॉझिटिव्ह; चौघांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या २६१

Next
ठळक मुद्देसोमवारी दिवसभरात आणखी चौघांची भर पडली.आज चार जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले.एक रुग्ण दि.७ तर अन्य तिघे दि.८ रोजी दाखल झाले होते.

अकोला : अकोल्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रचंड वेग घेतलेल्या कोरोना संसर्गाचा वेग काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसून, कोरोनाची बाधा होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सोमवार, १८ मे रोजी दिवसभरात चार नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १६१ वर पोहचली आहे. दरम्यान, आज राधाकिसन प्लॉट भागातील चार जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आज सायंकाळी कोणताही अहवाल प्राप्त झाला नाही. आतापर्यंत १२१ जणांना रुग्णालयातून सुटी, तर १८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्या १२२ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विदर्भात नागपूरनंतर अकोल्यातच सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले असून, दररोज यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. रविवार एकाच दिवशी तब्बल ३७ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या २५७ झाली होती. यामध्ये सोमवारी दिवसभरात आणखी चौघांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २६१६ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २५२२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २२६१ अहवाल निगेटीव्ह तर २६१ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ९४ अहवाल प्रलंबित आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी १०८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १०४ निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे रुग्ण फिरदौस कॉलनी, सुभाष चौक-रामदासपेठ, मोमीनपुरा-ताजनापेठ व सावंतवाड- रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत. अकोला शहरात नवनविन प्रभागांमध्ये रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, आज चार जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. हे चारही रुग्ण राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. यातील एक रुग्ण दि.७ तर अन्य तिघे दि.८ रोजी दाखल झाले होते. त्यांचेवरील उपचार पूर्ण झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळाली आहे.



१२१ कोरोनामुक्त
आता सद्यस्थितीत २६१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १८ जण (एक आत्महत्या व १७ कोरोनामुळे) मयत आहेत. सोमवार १८ मे रोजी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२१ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर २५७४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १४५७ गृहअलगीकरणात तर ५७ जण संस्थागत अलगीकरणात असे १५१४ जण अलगीकरणात आहेत. तर ९२४ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १३६ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Web Title: CoronaVirus in Akola: four positives throughout the day; Discharge to four; Total number of patients 261

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.