CoronaVirus in Akola : ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या बैदपुऱ्यातच होणार आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:20 AM2020-05-04T10:20:16+5:302020-05-04T10:20:25+5:30
काश्मीर लॉज येथे बैदपुरावासीयांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याचे समोर आले आहे. या भागातून कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता त्याला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी रविवारी फतेह अली चौकातील काश्मीर लॉज येथे बैदपुरावासीयांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या तपासणीसाठी प्रभागाचे नगरसेवक तथा डॉ.जिशान हुसेन यांनी पुढाकार घेतला आहे.
उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ च्या परिसरातून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत चालली आहे. या प्रभागातील बैदपुरा, ताजनापेठ, मोमिनपुरा, फतेह अली चौक, कलाल चाळ आदी भागात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या समोर येत आहे. बैदपुरा परिसरातीलच एक महिला रुग्ण तपासणीसाठी जयहिंद चौकमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी गेली होती. सदर महिलेचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर मनपा प्रशासनाने जयहिंद चौकातील खासगी रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व इतर चार जणांची आरोग्य तपासणी केली असता डॉक्टरसह ते सर्व पाचही जण कोरोनाबाधित निघाले. त्यामुळे प्रशासनाला जुने शहरातील प्रभाग क्रमांक आठ, प्रभाग क्रमांक १८ तसेच पूर्व झोनमधील प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाºया सुधीर कॉलनी व शिवर परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे लागले होते. एकूणच प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरातून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे लक्षात घेता मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी प्रभागातील सर्व नागरिकांची फतेह अली चौकातील काश्मीर लॉज येथे आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वैद्यकीय पथकाचे गठन करण्यात आले आहे.
मनपाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
४प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या तपासणीसाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी रविवारी मनपाच्या वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती केली. यामध्ये मनपाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, डॉ. विजय चव्हाण, डॉ. सदफ खान, डॉ. मोहिते, डॉ. मुसलोद्दीन व डॉ. वासिक अली यांचा समावेश आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांची या परिसरामध्येच आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.