CoronaVirus in Akola : अॅक्टिव्ह रुग्ण प्रथमच ७०० च्या पेक्षा जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 11:10 AM2020-09-04T11:10:18+5:302020-09-04T11:11:24+5:30
धक्कादायक बाब म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पहिल्यांदाच सातशेच्या वर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, गुरुवारी आणखी एकाचा मृत्यू झाला, तर ९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये २३ अहवाल रॅपिड टेस्टचे तर ७६ अहवाल आरटीपीसीआर चाचण्याचे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पहिल्यांदाच सातशेच्या वर पोहोचली आहे.
आॅगस्टच्या सुरुवातीला रुग्णसंख्या वाढीचा आलेख घटला होता; मात्र मागील १५ दिवसांपासून कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. रुग्णसंख्या सोबतच मृत्यूचा दरही झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी त्यात आणखी एकाची भर पडली. मृत्यू झालेला हा ७२ वर्षीय रुग्ण पातूर येथील रहिवासी होता.
३१ आॅगस्ट रोजी त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर दुसरीकडे ९९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यामध्ये आरटीपीसीआर चाचणीचे ७६ पॉझिटिव्ह अहवाल आहेत.
यामध्ये मोहरल बार्शीटाकळी येथील २० जण, डाबकी रोड व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी चार जण, अकोली जहागीर येथील तीन जण, कान्हेरी, कृषी नगर व बिर्ला कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित तुकाराम नगर, बालाजी नगर, बाळापूर, शास्त्री नगर, मराठा नगर, गुडधी, शिवसेना नगर, अडगाव, शंकर नगर, गोरक्षण रोड, जठारपेठ, सरस्वती भवन, आलेगाव ता. अकोट, गीता नगर, तेल्हारा, सुधीर कॉलनी, मोमीनपुरा, झोडगा ता. बार्शीटाकळी, जवाहर नगर, धामनधरी ता. बार्शीटाकळी, दोनद ता. बार्शीटाकळी, एसपी आॅफिसजवळ, माउंट कारमेलजवळ, न्यू तापडिया, छोटी उमरी व चोहट्टा बाजार, अकोट फैल, डाबकी रोड, तेल्हारा व अकोट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. गोरेगाव ता. अकोला, एरंडा ता. बार्शीटाकळी, बाळापूर, उमरी, खेळकर नगर व बोरगाव मंजू येथील आहे. अकोला ग्रामीणसह शहरातही आता रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
५७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २३ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १३ जण, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून तीन जण, खासगी रुग्णालय व हॉटेल येथून १५ जण, तर कोविड कोरोना सेंटर, हेंडज मूर्तिजापूर येथून तीन जणांना, अशा एकूण ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.