Coronavirus in akola: दिवसभरात एकाचा मृत्यू; ३० नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 06:53 PM2020-06-11T18:53:19+5:302020-06-11T18:53:51+5:30
अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे.
Next
href='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला : जिल्ह्यात कोरोना ने हैदोस घातला असून गुरुवारी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग सहा दिवसांपासून मृत्यूचे हे सत्र सुरूच असून या कालावधीत नऊ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे आणखी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ९१४ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतच असून अकोलेकरांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढिच सत्र ७ एप्रिल पासुन सुरु झालं ते अद्यापही थांबले नाही. मे महिन्यात पॉझिटिव रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत गेली. सरासरी पाच ते सहा दिवसातच पॉझिटिव रुग्णांनी शंभरी गाठत ९१४ चा आकडा पार केला. धक्कादायक बाब म्हणजे दर दिवसाआड एकाचा बळी गेला असून, मागील सहा दिवसात दररोज एकाचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. मृत्यूचे हे सत्र सुरूच असून गुरुवारी त्यात आणखी एकाची भर पडली. मृत झालेला रूग्ण हा ७६ वर्षीय पुरुष असून हरिहरपेठ परिसरातील रहिवासी आहे. हा रुग्ण ३ जून रोजी दाखल झाला होता. बुधवार १० जून रोजी रात्री उपचार घेतांना त्या रुग्णाचा मृत्यु झाला. यासोबतच गुरुवारी आणखी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये पाच जण आदर्श कॉलनी, तीन जण खदान, दोन जण तार फैल, दोन जण इंदिरानगर वाडेगाव ,दोन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित दसेरानगर, गुलजारपूरा, दगडीपूल, मोहतामिल, अकोट फैल, जीएमसी क्वांर्टर, गंगा नगर, बंजारा नगर, उमरी, शेलार फैल गुरुद्वारा पेठ जवळ, नेहरू नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी, टॉवर रोड, जुने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.तर सायंकाळी प्राप्त अहवालानुसार मोहता मील रोड आणि जुने शहर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१४ झाली आहे. तर मृतकांचा आकडाही ४३ झाला आहे. सद्यस्थितीत २९४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. १०८ अहवाल निगेटिव्ह बुधवारी दिवसभरात प्राप्त १३८ अहवाला पैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत .तर १०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . अशी आहे स्थिती एकूण पॉझिटिव्ह - ९१४मृत्यू - ४३डिस्चार्ज - ५७७अॅक्टिव्ह रुग्ण - २९४