CoronaVirus in Akola : सुखद... आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 06:42 PM2020-04-22T18:42:58+5:302020-04-22T18:45:25+5:30

आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

CoronaVirus in Akola: Pleasant ... Eight more reports negative | CoronaVirus in Akola : सुखद... आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह

CoronaVirus in Akola : सुखद... आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देएकूण ४३५ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. तर १८ अहवाल प्रलंबित आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा आकडा कमी होत असून, बुधवारी आणखी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आज अखेर एकूण ४६९ नमुने पाठविण्यात आले असून, त्यापैकी ४५१ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ४३५ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत, तर १८ अहवाल प्रलंबित आहेत.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४६९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३६९, फेरतपासणीचे ७२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २९ नमुने होते. आज आठ अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटीव्ह आले आहे. आजपर्यंत एकूण ४५१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३५६ तर फेरतपासणीचे ६६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४३५ आहे.
जिल्ह्यात आजअखेर कोविडबाधीत संख्या १६ आहे त्यातील दोघे मयत आहेत. उर्वरित ११ जणांचे अहवाल फेरतपासणीत निगेटीव्ह आले असून फेरतपासणीतही पॉझिटीव्ह आलेला तीन वर्षीय बालक व मयत रुग्णाचे मुलगा व मुलगी हे दोघे भावंड असे तिघे जण आहेत. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
आज तीन जण नव्याने दाखल झाले. आजअखेर जिल्ह्यात १८ अहवाल प्रलंबित असून त्यात १२ प्राथमिक तर सहा फेरतपासणीचे अहवाल आहेत. सद्यस्थितीत ३४ रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात आज अखेर ४९९ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे. त्यापैकी १९२ जण गृह अलगीकरणात तर ११७ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३०९ जण अलगीकरणात आहेत. १५५ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे तर विलगीकरणात आता ३४ जण दाखल आहेत. आज अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ४११२ जणांची तपासणी झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

 

Web Title: CoronaVirus in Akola: Pleasant ... Eight more reports negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.