CoronaVirus in Akola : सहाशेचा टप्पा ओलांडला; आणखी २४ पॉझिटिव्ह, एकूण बाधीत ६०५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:45 AM2020-06-01T11:45:12+5:302020-06-01T16:43:12+5:30
१ जून रोजी आणखी २४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांची संख्या ६०५ वर गेली आहे.
अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाच्या रुग्णवाढीचे सत्र सुरुच असून, १ जून रोजी आणखी २४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांची संख्या ६०५ वर गेली आहे.
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या लक्षणीय गतीने वाढत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सध्या कोरोनाचा विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. रविवार, ३१ मेपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५८१ होती. यामध्ये सोमवारी आणखी २४ रुग्णांची भर पडून हा आकडा ६०५ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून सोमवारी सकाळी ५८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३४ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १२ पुरुष आहेत. त्यात पाच जण रामदास पेठ येथील, तीन जण हरिहरपेठ येथील, दोन जण कमलानगर, दोन जण आंबेडकर नगर येथील तर उवरित खैर मोहम्मद प्लॉट, सिंधी कॅम्प, खदान, गुरुनानक नगर कौलखेड, रणपिसेनगर, मुजफ्फरनगर, अनिकट पोलीस लाईन, नुरानी मशिद जवळ खदान, खडकी, सरकारी गोदाम खडकी, भरतनगर व कोकनवाडी मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारासाठी संदर्भित केलेल्या ५८ वर्षिय महिलेचा काल मृत्यू झाला. ही महिला दि.२६ मे रोजी दाखल झाली होती. तिला दि.२९ मे रोजी नागपुर येथे हलविण्यात आले होते. रविवार, ३१ मे रोजी तिचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची सख्या आता ३३ झाली आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येचा समावेश आहे. आतापर्यंत एकून ४३२ जणंना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १४९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल-५८
पॉझिटीव्ह-२४
निगेटीव्ह-३४
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ६०५
मयत-३३(३२+१),डिस्चार्ज- ४३२
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १४०