CoronaVirus in Akola : दिवसभरात दहा पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 06:34 PM2020-05-09T18:34:26+5:302020-05-09T18:53:26+5:30

आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १४७ झाली आहे.

 CoronaVirus in Akola: Ten more positive ; Total number of patients at 147 | CoronaVirus in Akola : दिवसभरात दहा पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४७ वर

CoronaVirus in Akola : दिवसभरात दहा पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४७ वर

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, शनिवार, ९ मे रोजी यामध्ये आणखी १० जणांची भर पडली. शनिवारी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १३८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२८ अहवाल निगेटीव्ह तर १० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १४७ झाली आहे. आजअखेर प्रत्यक्षात १२१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुणांपैकी पाच जण माळीपुरा येथील असून ते एकाच परिवारातील आहेत. त्यात तीन महिला व एक चार वर्षे वयाचा बालक व अन्य एक ३३ वषार्चा पुरुष आहे. उर्वरित एक कंचनपूर येथील तसेच एक जुने शहर येथीलआहे. सकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या दोन्ही महिला असून त्यातील एक खैर मोहम्मद प्लॉट येथील तर दुसरी खंगनपुरा येथील आहे. खंगनपुरा येथिल महिला ही जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित झाली आहे. अन्य एक रुग्ण हा कारंजालाड जि. वाशिम येथिल मुळ रहिवासी असून तो सराफा बाजार येथे आला होता.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण १६६० नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १४०६ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण १२५८ अहवाल निगेटीव्ह तर १४७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २५४ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण १६८० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १४६३, फेरतपासणीचे ९६ तर वैद्यकीय कर्मचा?्यांचे १०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण १४०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १२०९ तर फेरतपासणीचे ९६ व वैद्यकीय कर्मचा?्यांचे १०१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १२५८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १४७ आहेत. तर आजअखेर २५४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १३८ अहवालात १२८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

१२१ पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १४७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील बारा जण (एक आत्महत्या व ११ कोरोनामुळे) मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना तर बुधवार दि.६ मे रोजी एकास असे १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १२१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

 

Web Title:  CoronaVirus in Akola: Ten more positive ; Total number of patients at 147

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.