CoronaVirus in Akola : ‘त्या’ ४१ डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा रुग्णालयातच मुक्काम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:17 AM2020-04-10T11:17:34+5:302020-04-10T11:17:46+5:30
एकूण ४१ जण रात्रंदिवस रुग्णालयातच थांबून कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत आहेत.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत दोन दिवसांत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नऊवर पोहोचली आहे. त्यामुळे डॉक्टर्स अन् इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेसोबतच कुटुंबीयांच्या सुरक्षेचीही जबाबदारी वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाºयांसह वर्ग चारचे कर्मचारी, असे एकूण ४१ जण रात्रंदिवस रुग्णालयातच थांबून कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात मनुष्यबळाचा मोठा प्रश्न असतानाच कोरोनासारखे संकट ओढवले आहे. या लढ्यात जिल्हा प्रशासनाची मदत होत असली तरी, खरी कसरत सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर कर्मचाºयांनाच करावी लागत आहे. त्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या नऊवर पोहोचल्याने पर्याप्त सुरक्षा-साधनांशिवाय या ठिकाणी जाणेही अनेक जण टाळत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी, असे जवळपास ४१ कर्मचारी युद्धपातळीवर रुग्णसेवा देत आहेत.
या कार्यात स्वत:ला पूर्णत: झोकून सेवा देत असताना, दुसरीकडे कुटुंबीयांच्याही सुरक्षेची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. रुग्णसेवा अन् कुटुंबाची सुरक्षा दोन्ही गोष्टींना प्राधान्य देत ते सर्व कर्मचारी रात्रंदिवस रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत. त्यांचे जेवण रुग्णालयातच होत असले तरी, आरामासाठी शहरातील एका लॉजवर त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कुटुंबीयांशी भेट आता फक्त आॅनलाइनच!
कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हे डॉक्टर्स आणि कर्मचारी घरी न जाता रुग्णालयातच राहत आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांना, विशेषत: मुलाबाळांना प्रत्यक्ष भेटता येत नसल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ कॉल्स आणि मेसेजवरच ते संवाद साधून आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत.
शेजाºयांकडून प्रोत्साहनाची गरज!
आरोग्य विभागात विशेषत: कोरोना रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने शेजाºयांकडून कुटुंबीयांना मिळणाºया वागणुकीचा अनुभव अनेक कर्मचाºयांनी घेतला आहे; पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढ्यात स्वत:च्या जीवाची बाजी लावणाºया या आरोग्य कर्मचाºयांसह त्यांच्या कुटुंबीयांना शेजाºयांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.