CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू; १५५ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 04:15 PM2020-09-13T16:15:03+5:302020-09-13T16:15:17+5:30
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५५४२ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार, १३ सप्टेंबर रोजी आणखी तीन रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८० वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५५४२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३८१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२६ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ६१ महिला व ९४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तिजापूर येथील २८, चिखली ता. मुर्तिजापूर येथील १०, तेल्हारा व केडिया प्लॉट येथील सात, डाबकी रोड, देशमुख फैल व जीएमसी हॉस्टेल येथील सहा, उमरी येथील चार, महसूल कॉलनी, मलकापूर, अडगाव, गौरक्षण रोड, खडकी, जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, सातव चौक, सदरपूर, गाडेगाव ता. तेल्हारा, कौलखेड, गिता नगर, न्यु तापडीया नगर, अकोट, बापूनगर येथील प्रत्येकी दोन, खोलेश्वर, शासकीय वसाहत, न्यु राधाकिसन प्लॉट, दहिहांडा, वाडेगाव, गंगानगर, वरुर जऊळका, आपातापा, संताजी नगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, वडद, नेर ता. तेल्हारा, शिवाजी नगर, राऊतवाडी, शंकरनगर, वडाळी देशमुख, रणपिसे नगर, हिवरखेड, मुंकूद नगर, राऊतवाडी, तोष्णीवाल ले आऊट, झोडगा ता. बाशीटाकळी, जवाहर नगर, कैलास नगर, गणोरी, भगवतवाडी, ज्योती नगर, अग्रवाल एक्सटेंशन, निमवाडी, वृंदावन नगर, बोर्टा, कान्हेरी सरप, धाबा,सिरसो, सत्यविजय अर्पाटमेन्ट, मोखा, राजूरा घाटे, गोरखेडी ता. मुर्तिजापूर, गायत्री नगर, शास्त्री नगर, खदान, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, माळीपूरा, जूने शहर व पवन चौक येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
अकोल्यातील दोन, अकोटातील एक रुग्णाचा मृत्यू
रविवारी तीन जणांचा मृत्यू झाला. अंकुर अर्पाटमेंट, सिटी कोतवाली, अकोला येथील ८१ वर्षीय पुरुष , देशमुख फैल, रामदास पेठ, अकोला येथील ३८ वर्षीय महिला व अकोट येथील ६१ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.
१२४५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५४२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४११७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १२४५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत