CoronaVirus in Akola : आणखी तीन बळी; ४७ पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ८७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:56 PM2020-07-04T12:56:31+5:302020-07-04T12:57:23+5:30
शनिवार, ४ जुलै रोजी आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
अकोला : अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. शनिवार, ४ जुलै रोजी आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८७ झाला आहे. तर एकूण रुग्ण संख्या १६६४ वर गेली आहे.
विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी एकूण २०४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर १५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह ४७ अहवालांमध्ये १५ महिला व ३२ पुरुष आहेत. त्यातील १४ जण पातूर येथील, १२ जण बाळापूर येथील, खोलेश्वर येथील चार जण, अकोट येथील चार जण, लहान उमरी, डाबकी रोड व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन जण तर बार्शीटाकळी, गिरीनगर, गंगानगर, अकोट फैल, वाशीम बायपास, आदर्श कॉलनी व वाशीम येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
तिघांचा मृत्यू
कोरोनामुळे शनिवारी तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तिघेही पुरुष असून, त्यातील एक जण बाळापूर येथील ३६ वर्षीय व्यक्ती आहे. या व्यक्तीला २३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. अन्य एक ७२ वर्षीय व्यक्ती अकोट येथील असून, त्यांना २ रोजी दाखल केले होते. खैर मोहम्मद प्लॉट येथील ७२ वर्षीय व्यक्ती असून, त्यांना २९ जून रोजी दाखल केले होते. या दोघांचा आज पहाटे मृत्यू झाला.
प्राप्त अहवाल-२०४
पॉझिटीव्ह-४७
निगेटीव्ह-१५७
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६६४
मयत-८७(८६+१)
डिस्चार्ज १२२२
दाखल रुग्ण(अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५५