CoronaVirus धक्कादायक! तीन वर्षीय बालकाला कोरोनाची लागण; २० जणांचे अहवाल निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 02:34 PM2020-04-17T14:34:26+5:302020-04-17T15:12:41+5:30
फेरतपासणी अंती पॉझिटीव्ह असलेला रुग्ण हा बैदपूरा येथील तीन वर्षीय बालक आहे.
अकोला : अकोला शहरातील बैदपुरा भागातील एका तीन वर्षीय बालकाच्या फेर तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी २१ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी २० निगेटिव्ह, तर १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज प्राप्त अहवालातील फेरतपासणी अंती पॉझिटीव्ह असलेला रुग्ण हा बैदपूरा येथील तीन वर्षीय बालक आहे.फेरतपासणीतील अन्य पाच निगेटीव्ह आले आहेत. फेरतपासणीतील जे ५ रुग्ण निगेटीव्ह आले आहेत. त्यात तिघे बैदपुरा भागातील, एक पातूर येथील, एक मुर्तिजापूर येथील आहे. मुर्तिजापूर येथील रुग्ण हा पॉझिटीव्ह रुग्ण नव्हता; मात्र तो थेट संपर्कातील असल्याने त्याची फेर तपासणी करण्यात आली आहे.
१७ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्याची स्थिती
एकूण पाठवलेले नमुने -३७५ (प्राथमिक तपासणी -३०३, फेर तपासणी ५९, वैद्यकीय कर्मचारी-१३)
आज प्राप्त अहवाल-२१(निगेटीव्ह-२०, पॉझिटीव्ह(फेर तपासणीतील)-०१)
(निगेटीव्ह २० मधील वर्गीकरण- प्राथमिक -१३, फेर तपासणी-५,वैद्यकीय कर्मचारी-२)
प्राप्त झालेले एकूण अहवाल-३०६ (प्राथमिक तपासणी-२५०, फेर तपासणी-४७, वैद्यकीय कर्मचारी-०९)
आजपर्यंत निगेटीव्ह अहवाल-२९१