Coronavirus in Akola : आज व उद्या दोन दिवस संपूर्ण ‘लॉकडाउन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:59 AM2020-05-04T09:59:09+5:302020-05-04T09:59:24+5:30

अकोला महानगरपालिका हद्दीत संपूर्ण लॉक डाऊन  वैद्यकीय सेवा वगळता  लागू केला आहे.

Coronavirus in Akola: Two days of complete 'lockdown' today and tomorrow | Coronavirus in Akola : आज व उद्या दोन दिवस संपूर्ण ‘लॉकडाउन’

Coronavirus in Akola : आज व उद्या दोन दिवस संपूर्ण ‘लॉकडाउन’

Next

अकोला शासनाने दि. १७ पर्यंत वाढवलेल्या लॉक डाऊन कालावधी याबाबत  जिल्हा प्रशासनाने आज आदेश निर्गमित केले असून  त्यानुसार रविवार दि. ३ चे मध्यरात्रीपासून ते  मंगळवार दि. ५ च्या मध्यरात्रीपर्यंत अकोला महानगरपालिका हद्दीत संपूर्ण लॉक डाऊन  वैद्यकीय सेवा वगळता  लागू केला आहे. तर मनपा क्षेत्र वगळता अन्य भागात पुर्वीच्या आदेशाप्रमाणे लॉक डाऊनचे पालन होईल. तर नंतर मनपा हद्दीत सम तारखांना पूर्वीच्या आदेशाप्रमाणे तर विषम तारखांना संपूर्ण लॉक डाऊन पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात आज निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. ३ ते दि.१७ मे पर्यंत लॉक डाऊन कालावधी वाढवण्यात आला आहे. या कालावधीत दि. ३ ते ५ दरम्यान अकोला मनपा हद्दीत  वैद्यकीय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवांसह बंद पाळण्यात येणार आहेत.  दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला  सकाळी सहा ते दहा व सायंकाळी चार ते सहा यावेळात अनुमती देण्यात आली आहे. तसेच दैनिक वृत्तपत्रांचे वितरण सुरु राहिल. 

या कालावधीत मनपा हद्दीतील  सर्व बॅंका, एलआयसी इ. सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला मुक्त संचार करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनुमतीने सुरु असलेले  मनपा हद्दीतील पेट्रोल व डिजेल पंप वगळून अन्य सर्व पंप बंद राहतील. नगरपरिषद व ग्रामिण भागातील पेट्रोल डिजेल पंप सुरु राहतील.   एमआय डीसी अकोला येथील परवानगी दिलेले उद्योग सुरु राहतील.  तथापि, नगरपरिषद व ग्रामिण भागाकरीता  पुर्वी दिलेले (दि.१९ एप्रिल) आदेश लागू राहतील.

सम तारखांना मर्यादित तर विषम तारखांना पूर्ण ‘लॉकडाउन’

दरम्यान याच आदेशानुसार, सम तारखांना म्हणजे दि. ६, ८, १०, १२, १४ व १६ मे रोजी पुर्वीच्या (दि.१९ एप्रिल) आदेशाप्रमाणे  संचारबंदी कायम राहिल.  तर विषम तारखांना म्हणजेच दि. ७, ९, ११, १३, १५ व १७  तारखेला आज दिलेल्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय सेवा वगळता मनपा हद्दीत संपूर्ण लॉक डाऊन पाळण्यात येईल. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Coronavirus in Akola: Two days of complete 'lockdown' today and tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.