CoronaVirus in Akola : आणखी दोन पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १५६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:22 AM2020-05-11T11:22:54+5:302020-05-11T11:50:49+5:30
मोठी उमरी येथील ५५ वर्षीय व्यक्ती, तर किल्ला चौकातील ११ वर्षीय बालकास कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अकोला : एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत धिम्या गतीने असलेल्या कोरोना संसर्गाने मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच ‘गिअर’ बदलला असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवार, ११ मे रोजी यामध्ये आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, हे रुग्ण मोठी उमरी व जुने शहरातील किल्ला चौक परिसरतील आहेत. मोठी उमरी येथील ५५ वर्षीय व्यक्ती, तर किल्ला चौकातील ११ वर्षीय बालकास कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आजच्या दोन रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन ती १५६ झाली आहे. सद्यस्थितीत १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अकोला शहरातील रुग्णसंख्या मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. रविवार, १० मे रोजी दिवसभरात सात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. सोमवारी यामध्ये आणखी दोघांची भर पडत एकूण रुग्णसंख्या १५६ वर पोहचलजे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजाराने झाला आहे. तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. सोमवारी एकूण ४३ अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित ४१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१५६
मयत-१३(१२+१),डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२९