CoronaVirus in Akola : आणखी दोन नवे संशयित रुग्ण आयसोलेशन वॉर्डात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 06:13 PM2020-03-25T18:13:53+5:302020-03-25T18:16:22+5:30
दोन संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल झाले आहेत.
अकोला: कोरोनाच्या संशयावरून सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या २१ रुग्णांपैकी १७ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. गुरुवारी दोन आणखी नवे संशयित रुग्ण आयसोलेशन वॉर्डात दाखल झाले असून, चौघांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण कोरोनाचा पॉझिटिव्ह आला नाही. ही अकोलेकरांसाठी दिलासादायक बातमी असली, तरी दररोज संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी आणखी दोन संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल झाले आहेत. त्यानुसार, आयसोलेशन कक्षात सध्या ५ संशयित रुग्ण दाखल असून, त्यापैकी चौघांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. एकाचा अहवाल निगेटिव्ह असला तरी, त्या रुग्णावर आयसोलेशन कक्षातच उपचार सुरू आहेत. चारही रुग्णांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत.