CoronaVirus : आणखी एकाचा मृत्यू, ५ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ९६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:49 AM2020-07-14T11:49:10+5:302020-07-14T11:49:36+5:30
पातूर येथील आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९६ झाली.
अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचाचा वेग काहीसा मंदावला असला, तरी या जीवघेण्या आजाराचा कहर मात्र सुरुच आहे. मंगळवार, १४ जुलै रोजी या जीवघेण्या आजाराने पातूर येथील आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९६ झाली. तसेच आणखी ५ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९०६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी ८५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ५ जणांमध्ये सर्वजण पुरुष आहेत. हे रुग्ण अकोट, अकोला शहरातील गुलजारपुरा, गंगानगर, लक्ष्मीनगर आणि अकोट तालुक्यातील करोडी येथील प्रत्येकी एक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
६५ वर्षीय महिला दगावली
दरम्यान, पातुर येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला दि. ५ जुलै रोजी दाखल झाली होते.उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या ९६ झाली आहे.
२६२ अॅक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १९०६ (१८८५+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९६ जण (एक आत्महत्या व ९४कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १५४८ आहे. तर सद्यस्थितीत २६२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
प्राप्त अहवाल-८५
पॉझिटीव्ह-५
निगेटीव्ह- ८०
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८८५+२१= १९०६
मयत-९६(९५+१)
डिस्चार्ज- १५४८
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २६२