CoronaVirus : अकोला जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; १८ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:18 PM2020-10-10T12:18:56+5:302020-10-10T12:19:02+5:30
CoronaVirus Akola, Death Toll महिला रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५४ वर गेला आहे.
अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. शनिवार, १० आॅक्टाबर रोजी शहरातील आणखी एक कोरोनाबाधित महिला रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५४ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७९० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर व टॉवर चौक येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, आलेगाव ता. पातूर, जठारपेठ, वर्धमान नगर, खंडाळा बाळापूर, बोरगाव मंजू, रवी नगर, आरटीओ आॅफिस जवळ, पिंपळखुटा, वाशिम बायपास, खडकी व हनुमान वस्ती येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
५५ वर्षीय महिलेचा मृत्यू
शनिवारी आणखी एका मृत्यूची नोंद झाली. ही ५५ वर्षीय महिला देवीकर आखाडा, जठारपेठ भागातील असून, त्यांना ९ आॅक्टोबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
७५६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,७९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६७८० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७५६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.