CoronaVirus : अकोला जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, २९ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 16:28 IST2021-01-16T16:28:00+5:302021-01-16T16:28:06+5:30
Akola News २९ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,११७ वर पोहोचली आहे.

CoronaVirus : अकोला जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, २९ नवे पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ३२६ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २९ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,११७ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प व पुर्वा काम्पलेक्स येथील प्रत्येकी दोन, तर पिंजर ता. बार्शिटाकळी, अकोट, डाबकी रोड, जूने शहर, तरोडा कसबा ता. बालापूर, आदर्श कॉलनी, बलवंत कॉलनी, शिवाजी नगर, जिल्हा परिषद कॉलनी, दिपक चौक, राऊतवाडी, सुधीर कॉलनी, कौलखेड, रतनलाल प्लॉट, आनंद नगर, हिंगणा रोड, राजेश्वर मंदिर, नयागाव व हिंगणा रोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६० वर्षीय पुरुष दगावला
शनिवार आरोग्य नगर, खदान येथील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
६५१ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,११७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,१३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.