CoronaVirus : बोरगावात पोलिसांच्यावतीने जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 05:22 PM2020-03-21T17:22:34+5:302020-03-21T17:22:41+5:30

व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने, हॉटेल बंद ठेवून पोलिस प्रशासनाला सहकार्य केले.

CoronaVirus: Awareness on behalf of the police in Borgaon Manju | CoronaVirus : बोरगावात पोलिसांच्यावतीने जनजागृती

CoronaVirus : बोरगावात पोलिसांच्यावतीने जनजागृती

googlenewsNext

बोरगाव मंजू : राज्यात कोरोना विषाणूंमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आह. ठाणेदार हरिश गवळी यांच्यासह पोलीसांनी मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसरात जाऊन सर्व व्यावसायिकांना कोरोना विषाणूंमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनतेने खबरदारी घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवु नये, असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने, हॉटेल बंद ठेवून पोलिस प्रशासनाला सहकार्य केले.

कोरोना विषाणूंमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. व्यावसायीकांकडून प्रतिसाद मिळत आहे. - हरीश गवळी, ठाणेदार, बोरगाव मंजू.

Web Title: CoronaVirus: Awareness on behalf of the police in Borgaon Manju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.