CoronaVirus : साडेपाचशेचा टप्पा ओलांडला; दिवसभरात ४२ पॉझिटिव्ह; एकूण बाधित ५५८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 07:36 PM2020-05-29T19:36:57+5:302020-05-29T20:05:15+5:30
दिवसभरात ४२ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५५८ झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याचे सत्र सुरुच असून, शुक्रवार, २९ एप्रिल रोजी दिवसभरात आणखी ४२ रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५५८ झाली आहे. यापैकी २९ रुग्णांचा मृत्यू, तर ३८९ रुग्णांना उिस्चार्ज देण्यात आल्याने आता १४१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी दिली.
विदर्भातील सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण अकोल्यात असून, कोरानाचे सर्वाधिक बळीही अकोल्याच गेले आहेत. गुरुवार, २८ मे रोजी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५१६ होता. यामध्ये शुक्रवारी ४२ रुग्णांची भर पडत हा आकडा ५५८ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून शुक्रवारी २७६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर २३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये १७ महिला व २७ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित जठारपेठ, कौलखेड, गोरक्षण रोड, जुने शहर, न्यु खेतान नगर कौलखेड, हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत. तर सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये गायत्रीनगर येथील सात, कौलखेड येथील चार, रामदास पेठ येथील दोन, मोठी उमरी येथील दोन, सोनटक्के प्लॉट येथील दोन, रजपुतपुरा येथील दोन, अकोट फैल येथील दोन, जुने शहर येथील दोन तर न्यु तारफैल, हिंगणा रोड, बार्शीटाकळी, कैलास टेकडी, खैर मोहम्मद प्लॉट, मोमीनपुरा, काला चबुतरा, खदान, सिंधी कॅम्प, रेल्वे स्टेशन व गोकुळ कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. यापैकी २८ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे.
३९ जणांना ‘डिस्चार्ज’
एकीकडे कोरोनाच्या कचाट्यात सापडणाºयांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ३८८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.